भोसले एज्युकेशनचं नवं कॉलेज आता स्मार्ट सिटीत

BIPRची स्थापना
Edited by: विनायक गावस
Published on: August 21, 2023 16:13 PM
views 230  views

सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी यांच्यामार्फत डोंबिवली येथे 'बॉंबे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च' (BIPR) या नवीन कॉलेजची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील हे पहिलेच कॉलेज आहे.

कॉलेजला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया व तंत्रशिक्षण विभागाची मान्यता मिळाली असून मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. कॉलेजचा 'डिटीई कोड 3542' असा आहे. या ठिकाणी बी.फार्मसी व डी.फार्मसी हे दोन्हीही अभ्यासक्रम उपलब्ध असून चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू आहेत.  सर्वांच्या सदिच्छांमुळेच संस्थेला हे पाऊल टाकणे शक्य झाले असून भविष्यात आपला स्नेह वृद्धिंगत व्हावा अशी भावना संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी व्यक्त केली आहे.