भोसले फार्मसी कॉलेजमध्ये डी. फार्मसी प्रवेश सुविधा केंद्र | अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 जुलै

Edited by: विनायाक गावस
Published on: June 24, 2023 15:20 PM
views 66  views

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले डी.फार्मसी कॉलेजमध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचे प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी) प्रवेशासाठीचे सुविधा केंद्र सुरू झालेले आहे. औषधनिर्माणशास्त्र पदविका २०२३-२४ प्रवेशासाठी आवश्यक असणारा ऑनलाईन अर्ज महाविद्यालयात मोफत भरून दिला जात असून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाते. प्रवेश प्रक्रिया संदर्भातील सर्व शासन निर्णय, विविध तारखा व शिष्यवृत्त्या यांची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देणे याठिकाणी सुरु आहे.प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ जुलै असून या कालावधीत कागदपत्र पडताळणी, अर्ज निश्चिती, अर्ज छाननी, त्रुटी नोंदविणे इ. विविध बाबींचे सुविधा केंद्रावर निराकरण करण्यात येईल. यानंतर ५ जुलैला तात्पुरती तर ११ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतरच संस्था निवडण्यासाठीच्या पसंतीक्रम फेरीला (कॅप राउंड) सुरुवात होईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन बी. फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप व डी. फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे यांनी केले आहे.