
कणकवली : लोरे गावातील श्रद्धास्थान श्री देव गांगेश्वर मंदिर येथे पाण्याची गरज लक्षात घेऊन कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती मनोज रावराणे यांच्या स्व - फंडातून विहीर व टाकी व्यवस्था करणे हे काम मंजूर केले होते. या कामाचे भुमिपुजन लोरे सरपंच अजय रावराणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती मनोज रावराणे, देवस्थानचे प्रमुख तथा लोरे सरपंच अजय तुळशिदास रावराणे ग्रामपंचायतचे सदस्य अनंत राणे, नरेश गुरव, काशीराम नवले,ग्रामसेवक ऋतुराज कदम, महेश रावराणे, आप्पा गुरव , नारायण रावराणे,प्रकाश रावराणे, रघुनाथ रावराणे, कृष्णा गुरव, दयानंद गुरव, मुकुंद गुरव,सदानंद गुरव, प्रकाश गुरव, सुनील रावराणे, शंकर पेडणेकर, मनोहर गुरव,व गावातील ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.