आंबेगावातील रस्त्याचं भूमिपूजन !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 09:46 AM
views 171  views

सावंतवाडी : आंबेगाव गावामध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या प्रयत्नामुळे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजनेमधून मंजूर केलेल्या आंबेगाव मुख्य रस्ता ते क्षेत्रपाल मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. भाजपा जिल्हा सरचिटणीस व जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आंबेगाव सरपंच शिवाजी परब, उपसरपंच रमेश गावडे, भाजपा आंबोली मंडळ महिला अध्यक्षा प्राजक्ता केळुस्कर शक्ती केंद्र प्रमुख तसेच ग्रा.पं सदस्य योगेश गवळी, बूथ कमिटी अध्यक्ष संतोष राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा तसेच ग्रा.पं सदस्या  साक्षी राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा तसेच ग्रा.पं सदस्या तेजस्वी गावडे, ग्रा.पं सदस्या आनंदी मुळीक ग्रा.पं सदस्या  प्रणाली परब, कोलगाव ग्रा.पं सदस्य संदिप हळदणकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्र्वर परब, गाव प्रमुख नामदेव परब,ग्रा.से. अमित राऊळ, कारीवडे पो.पा प्रदीप केळुस्कर,अण्णा केळुसकर केशव मुळीक आंबेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.