
दोडामार्ग : झोळंबे पंचक्रोशीच्या श्री देवी माऊली दुग्ध विकास सहकारी संस्था नूतन इमारतीचे भूमिपूजन शिवसेना तालूकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते झाले. संस्था स्वनिधी व लोकवर्गणीतून ही इमारत बांधकाम करत आहेत. यावेळेस संस्थाध्यक्ष हरिष गावडे, उपाध्यक्ष जोशी, सचिव दिपक गवस, उपसरपंच विनायक गाडगीळ, पोलीस पाटील संजय गवस, तंटामुक्त अध्यक्ष सुखाजी गवस, बाबल गवस, नाना गवस, प्रभाकर गवस, पांडुरंग गवस, भूषण भिडे, जमीन मालक श्रीमती धरणे व संस्थेचे सवॅ संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते. झोळंबे पंचक्रोशीच्या श्री देवी माऊली दुग्ध विकास सहकारी संस्थेच्या माध्यमातून अनेक पशुपालकांना दुग्ध व्यवसाय करण्याची मोठी संधी निर्माण झाली असून संस्था सभासदांसाठी हक्काची इमारत बांधकाम करत असल्याने सभासद व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे.