
सावंतवाडी : मळेवाड येथील डोंगरी विकास निधीतून मंजूर झालेल्या सावंतवाडी शिरोडा मुख्य रस्ता ते माळकरटेंब देउळवाडी या रस्त्याचे भूमिपूजन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी केले.
त्यावेळी मळेवाड कोंडूरे सरपंच मिलन विनायक पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, मधुकर जाधव, कविता शेगडे, सानिका शेवडे, जनार्दन नाईक, माजी सदस्य भगवान मुळीक, नाना कुंभार, जिजी मुळीक, प्रकाश मुळीक, विनायक पार्सेकर, भिकाजी माळकर, अरू माळकर, ज्ञानेश्वर मुळीक, दादा मोरुडकर, दीपक करमळकर, बाबुराव कुंभार, संभाजी कुंभार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.