
दोडामार्ग : तळकट कोलझर कुंभवडे चौकुळ मार्गावर कोलझर येथे मंजूर असलेल्या पुलाचे भूमिपूजन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच झाले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजपाचे राजन म्हापसेकर, शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री यांसह कोलझर गावच्या सरपंच सौ. सुजल गवस, झोळंबे गावच्या सरपंच विशाखा नाईक, माजी सभापती विशाखा देसाई, सूर्यकांत गवस, शरद देसाई, संजय देसाई, उपसरपंच विनायक गाडगिळ, झोळंबे, माजी सरपंच राजेश गवस, यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून तळकट कोलझर कुंभवडे चौकुळ मार्गावर कोलझर येथे पुल मंजूर झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे.