
कणकवली : कणकवली तालुक्यातील गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांची मागणी असलेला घोणसरी वळणाची कोंड डी पी राणे यांच्या घराजवळ जाणाऱ्या रस्त्याला मोरी बांधणे या कामाला आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि माजी सभापती मनोज रावराणे यांच्या विशेष पाठपुराव्याने डोंगरी विकास योजनेअंतर्गत ७ लाख रु.चा निधी मंजूर झाला. या कामाचे भूमिपूजन भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मा.सभापती मनोज रावराणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर, घोणसरी सरपंच मृणाल पारकर, उपसरपंच विलास मराठे,सोसायटी चेअरमन डी पी राणे,हायस्कूलचे चेअरमन भाई राणे,भाजपा तालुका कार्यकारणी सदस्य रवींद्र सावंत, भाजपा बूथ अध्यक्ष संजय शिंदे,बाबू राणे, ग्रा.पं.सदस्य प्रसाद राणे,सोसायटी संचालक विश्वजित राणे,मिलिंद मराठे, विजय एकावडे,विठ्ठल बागवे,दिलीप राणे,कृष्णा पेडणेकर, अनिल चव्हाण, श्री साळसकर आदि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
गेली कित्येक वर्षे मागणी असलेला काॅजवेचा प्रश्न सुटल्याने घोणसरीवासिय ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.