
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हयातील दोडामार्ग तालुक्यातील तालुका क्रिडा संकुल इमारतीचे बांधकाम करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, वैभव नाईक, अनिकेत डावखरे, नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार ६ जून ला सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार आहे.
तर आयुक्त क्रिडा व युवक संघ सुहास दिवते (भा.प्र.से), जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी,शरद राजभोज मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, कोकण २, उपसंचालक संजय सबनीस,श्रीमती छाया नाईक अधिक्षक अभियंता,अनामिका जाधव कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, सावंतवाडी, सा.बां. मंडळ रत्नागिरी, विद्या शिरस जिल्हा क्रिडा अधिकारी सिंधुदुर्ग्, तहसिलदार अरूण खनोलकर, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, शशांक भगत उपविभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग दोडामार्ग हे सुध्दा उपस्थित राहणार आहेत.