आसोलीत विकासकामाचे भूमिपूजन | दीपक केसरकर यांच्या स्थानिक आमदार निधीतून काम मंजूर

Edited by: दिपेश परब
Published on: August 28, 2023 15:38 PM
views 176  views

वेंगुर्ला : तालुक्यातील आसोली- तळवडे मुख्य रस्ता ते पाटलेकरवाडी पायवाट काँक्रीटीकरण करणे या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या स्थानिक आमदार निधीतून  मंजूर झालेल्या कामाचे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल मोरजकर, उपतालुकाप्रमुख देवा कांबळी, आडेली ग्रामपंचायत सदस्य सुधीर धुरी, ग्रामस्थ भाऊ पाटलेकर, रवी पाटलेकर, मोहन पाटलेकर, भानुदास पाटलेकर, महादेव पाटलेकर, नारायण पाटलेकर, नीरज पाटलेकर, लक्ष्मण पाटलेकर, अनिल पाटलेकर, आशिष पाटलेकर, राजन पाटलेकर, सुनिल पाटलेकर, समीर पाटलेकर, लक्ष्मण नाईक, नीरज नाईक, राकेश खवणेकर, साहिल खवणेकर, प्रकाश नाईक साहिल बागकर आदी उपस्थित होते.