बंदिस्त गटार बांधकामाच्या कामाचं भूमिपूजन

Edited by:
Published on: December 12, 2023 13:00 PM
views 116  views

सावंतवाडी : शहरातील उभाबाजार येथील जुने पोलीस ठाणे ते बंगलेकर दुकानपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या बंदिस्त गटार बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन माजी आरोग्य सभापती नगरसेवक सुधीर आडिवरेकर व आनंद नेवगी यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून नगरोत्थान अंतर्गत १८ लाखांचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक ३ व ५ मधील या कामासाठी माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर व आनंद नेवगी यांनी विशेष प्रयत्न केलेत.

हे काम नगरोत्थान योजनेतून मार्गी लावल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, स्थानिक आमदार तथा मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, माजी आरोग्य सभापती नगरसेवक सुधीर आडीवरेकर व माजी नगरसेवक आनंद नेवगी यांचे विशेष आभार मानले. या भूमिपूजन प्रसंगी भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेवक मनोज नाईक, भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख देवेंद्र म्हापसेकर, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, शर्वरी धारगळकर, मेघना साळगावकर, राघू चितारी, आप्पा मुद्राळे, सुभाष ढेकणे, रमेश ढेकणे, दिगंबर मठकर, संजय मडगावकर, वैभव तानावडे, महेश म्हापसेकर, निलेश कुबडे, दिलाल बंगलेकर आदिंसह स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.