
कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून भिरवंडे गावासाठी बीएसएनएल टॉवर मंजूर करण्यात आला. भूमिपूजन शुक्रवार 27 ऑक्टोबर रोजी शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी भिरवंडे गावातील उपसरपंच नितीन सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुकाप्रमुख हेमंत सावंत, विभागप्रमुख मंगेश सावंत, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख बेनी डिसोजा, ग्रामपंचायत सदस्य रश्मी सावंत, संतोष सावंत, प्रकाश गावकर, मनीष सावंत, सचिन सावंत, मिलिंद सावंत, संतोष बळीराम सावंत, पुरुषोत्तम सावंत, दिगंबर सावंत, उमेश सावंत, कमलेश नारकर, प्रकाश सावंत, आनंद सावंत, संतोष सावंत, राजेंद्र मेस्त्री, संदीप सावंत, सुरेंद्र सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. भिरवंडे गावातील मुरडवेवाडी व जांभुळबाटलेवाडीतील नागरिकांना मोबाईल व इंटरनेटची सुविधा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध होत नव्हती खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून बीएसएनएल टॉवरला मंजूरी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केेले.