सभागृहाच्या कामाचे संदीप साटम यांच्या हस्ते भूमिपूजन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 22, 2024 13:37 PM
views 428  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव पाडाघर येथे 25/15 मधून सभागृहाचे काम आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे. या साठी दहा लाख एवढा भरघोस निधी उपलब्ध झाला होता. या मंजूर कामाचे भूमिपूजन भाजप जिल्हा सरचिटणीस तथा कणकवली विधानसभा संयोजक संदीप साटम यांच्या हस्ते पार पडले .

यावेळी मंडल अध्यक्ष राजेंद्र शेटये ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमित साटम ,शिरगाव सरपंच समीर शिरगावकर, उपसरपंच संतोष फाटक ,मंगेश लोके ,शैलेश जाधव ,नंदू देसाई ,बूथ अध्यक्ष शशी गोठणकर,संतोष गोठणकर, किरण गोठणकर ,अंबाजी लाडगावकर ,उमेश गोठणकर ,अरुण गोठणकर,सूर्यकांत गोठणकर,सदानंद चिंदरकर,अभय चिंदरकर,सुहास गोठणकर,शरद गोठणकर,रमेश गोठणकर, शांताराम नाटळकर, विनायक गोठणकर,विजय चिंदरकर,प्रसाद चिंदरकर,दिलीप गोठणकर,सुरेश कडू,बाळकृष्ण झोरे, रवींद्र चिंदरकर,सुबोध गोठणकर,रोहित गोठणकर इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बरेच वर्षाची सभागृहाची मागणी पूर्ण झाल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.तसेच संदीप साटम यांनी वाडीच्या विकासासाठी भाजपा कटिबध्द आहे असे सर्व ग्रामस्थांना आश्वस्थ केले.