दोडामार्ग शहरात सोमवारी विविध विकास विकासकामांची भूमिपूजने

शहरवासीयांनी विकास प्रक्रियेत सहभागी होण्याचे नगराध्यक्षांचं आवाहन
Edited by:
Published on: March 10, 2024 14:16 PM
views 84  views

दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायत तर्फे दोडामार्ग शहरात एकाच उद्या सोमवारी ११ मार्च ला एकाच दिवशी विविध विकास कामांची भूमिपूजने व लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेत. नगराध्यक्ष चेतन चव्हाण व सभापती तसेच नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असून शहराच्या विकास प्रक्रियेत शहर वासियानी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष चव्हाण यांनी केलं आहे.  

शहरात सोमवारी कसई- दोडामार्ग धाऊस्कर कॉलनी सर्व्हे नं. ४४/९ अ मधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर बांधकाम करणे, कसई- दोडामार्ग तहसिल कार्यालय हद्दीत सार्वजनिक सुलभ शौचालय बांधणे, दोडामार्ग तिराळी मुख्य रस्ता ते केळीचे टॅब रस्ता दुरूस्ती करणे, कसई शहरातील प्रभाग क्र. १० मध्ये ऑकार कॉलनी हनुमान कॉलनी येथे पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाईप लाइन घालून नळकनेक्शन देणे, नगरपंचायत हद्दीतील सुरूचीवाडी मयेकर घर ते आनंद तांबुळकर घराशेजारी गटार बांधकाम करणे, वॉर्ड क्र. ११ मधील सार्वजनिक विहिरीचे नुतनीकरण करणे, वडेश्वर मंदिर येथे हायमास्ट बसवणे., कसई वॉर्ड क्र. ७ मधील चव्हाटा येथे हायमास्ट बसवणे, कसई - दोडामार्ग शहरातील हनुमान कॉलनी अंकिता बिल्डींग समोर कॉक्रीटचे बंदीस्त गटार बांधणे, नगरपंचायत हद्दीतील सावंतवाडा येचील चव्हाटा रस्ता दुरूस्ती करणे, कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील अटलबिहारी वाजपेयी उद्यानाबाहेर बचत गटांसाठी स्टॉल्स उभारणे, कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील अटलबिहारी वाजपेयी उद्यानाबाहेर बचत गटांसाठी स्टॉल्ससाठी साहित्य पुरवठा करणे, कसई - दोडामार्ग म्हावळणकरवाडी याऊस्कर फार्म हाऊससमोर ओढ्यावर ब्रीजकम बंधारा व संरक्षण भिंत बांधकाम करणे, कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील नियोजित मच्छिमार्केट जागेत विहिरीचे बांधकाम करणे, कसई - दोडामार्ग वॉर्ड क्र. १४ मधील साईबाबा मंदिर कॅनलकडून ते वडेश्वर मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, दोडामार्ग गावडेवाडी अशोक पत्की घर ते आर के देसाई घर रस्ता खडीकरण डांबरीकरण व गटार बांधकाम करणे, कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील राज्यमार्ग क्र. १८९ लगत असणाऱ्या तळ्याचे सुशोभिकरण करणेबाबत, कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील काळवेकर कॉलनी येथे खुल्याक्षेत्रात गार्डन व ओपन जिम प्रस्ताविक करणे, कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील शासकीय वाचनालय इमारतीवर सार्वजनिक सभागृह बांधणे, कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील केळीचे टॅब ते अभिजित देसाई यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील म्हावळंकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण व कॉक्रीट गटार बांधकाम करणे,  नगरपंचायत हद्दीत नळधारकांना पाणीपुरवठ्यासाठी ७५mm PVC पाईपलाईन वितरीत करणे, नगर पंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. ४ भोसले कॉलनी पाटील यांचे घर ते तळेकर घरापर्यत गटार बांधकाम करणे, नगरपंचायत हद्दीतील सोलदेवाडी जोशी प्लॉट ते मराठे घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, वरची घाटवाडी पार्वती महादेव गवस घर ते शाहु बाबू बोडेकर घरापर्यत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, म्हावळकरवाडी मुख्य रस्ता ते विनया म्हावळंकर यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,  कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील नवीन स्ट्रीट लाईटचे लोकार्पण करणे, कसई - दोडामार्ग नरपंचायत हद्दीतील पंचशील नगर येथील सर्व्हे नं. ९९७ हि.न. ४ अ मध्ये समाजमंदिर चे बांधकाम करणे, कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील पंचशीलनगर येथील सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण करणे आदी कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे.