कारिवडेत विकासकामांची भूमिपूजने !

Edited by: ब्युरो
Published on: March 11, 2024 12:30 PM
views 274  views

सावंतवाडी : तालुक्यातील कारिवडे गावामध्ये विकासकामांची भूमिपूजने नुकतीच करण्यात आली. भारतीय जनता‌ पार्टीचे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा बॅंक संचालक महेश ‌सारंग यांच्या हस्ते या विकासकामांची भूमिपूजने व उद्घाटन करण्यात आले. यामध्ये कारिवडे  रामा १८० ते कारिवडे पेडवेवाडी गावठणवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरणासाठी १६९.९६ लक्ष निधी मंजूर तसेच कारिवडे गावकरवाडी रस्ता मजबुतीकरण करणे निधी ८२४१७०/- मंजूर आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी कारिवडेच्या सरपंच आरती अशोक‌ माळकर, उपसरपंच नितीन गावडे, माजी‌ पं. स. सदस्या प्राजक्ता केळुसकर, ग्रा. पं. सदस्य महेश‌ गावकर, ग्रा. पं. सद्स्य तुकाराम बंटी आमुणेकर, ग्रा.पं. सदस्य भिकाजी कवठणकर, ग्रा.पं. सदस्या भाग्यश्री भारमल, ग्रा.पं. सदस्या साक्षी परब, ग्रा.पं. सदस्या अरुणा सावंत, अशोक‌ माळकर, भाजपा आंबोली‌ मंडळ उपाध्यक्ष आनंद तळवणेकर, शक्ती प्रमुख, सिंध्‍देश साकुळकर, बुथ अध्‍यक्ष कारिवडे प्रभाग-२, अमर धोंड, युवा प्रमुख, तानाजी साईल, माजी सरपंच भालचंद्र भारमल, मधूमती परब, उमेश गावकर, रवींद्र ठाकूर, व्हा.चेअरमन कारिवडे सोसायटी, सोनू सावंत, कारिवडे सोसायटी संचालक, लक्ष्मण भालेकर, भालचंद्र भारमल, विनायक साकुळकर, विजय पवार, चारुदत्त गावडे, अरुण बांदेकर, गुरुनाथ गावडे, अक्षय माळकर, संदिप माळकर, हर्षल हिर्लेकर प्रदिप केळुसकर, बाळकृष्‍ण बांदेकर , बाबा गावकर, विठ्ठल गावकर, राघोबा परब, आनंद परब, लक्ष्‍मण गावकर,  नागेश गवळी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.