
सावंतवाडी : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरातील मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर करण्यात आले आहेत. या कामांची भूमिपूजने न.पचे विद्यमान नगरसेवक तसेच शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रीफळ वाढवून करण्यात आले.
शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी प्रत्येक प्रभागात स्थानिक नागरिकांचा सन्मान करत विकास कामांचे भूमिपूजन करण्याचा मान दिला. सावंतवाडी नगर परिषदेच्या मोती तलाव येथे रंगीत कारंजा आणि लेझर शो काम, मोती तलाव येथे रंगीत कारंजा आणि लेझर शो साठी २०० के व्हिए ट्रान्सफॉर्मर, मोती तलाव जलक्रीडा केंद्रासाठी स्वॉन पेडल बोट, मोटार बोट, स्कूटरबोट, जेटी, गांधी चौक सुशोभिकरण, उभाबाजार येथील भिसे उद्यान दर्जावाढ, पांजरवाडा रस्ता स्वामी समर्थ अपार्टमेंट ते होली क्रॉस चर्च पर्यंत गटार बांधकाम, जुम्मा मशीद जवळ मठकर घर ते अस्लम खान (शिरोडकर) घराजवळील पाणंद मजबुतीकरण, वैश्यवाडा आकेरकर घरा जवळील संरक्षक भिंत, वैश्यवाडा हनुमान मंदिर समोर ओपन जिम, गोविंद नाट्यमंदीर समोरील मसुरकर घराकडे जाणारी पाणंद पेवर ब्लॉक, जना फिश व मटण मार्केटसाठी आरक्षित जागेत मटण मार्केटचे, झिरंग विभागातील गोवेकर कॉलनी येथील न. प. च्या मालकीच्या खुल्या जागेत बहउददेशीय इमारत, जिमखाना राज्य महामार्गापासून रमाई वस्तीकडे जाणा- या रस्त्याचे डांबरीकरण, मिलाग्रीस हायस्कूल समोरील जागेत दोन सोलर हायमास्ट, सालईवाडा आब्लर्ट फनीडीस घराजवळील मोरी, वृद्धाश्रमा समोरून जाणारा कॉलनी अंतर्गत रस्ता गटार व डांबरीकरण, गरड विभागातील कुणकेरकर घरासमोरील न. प. च्या मालकीच्या खुल्या जागेत बहुउद्देशीय इमारत, शिवराम राजे पुतळा उद्यान, सावंतवाड़ी कविवर्य वसंत सावंत मागे दोन्ही बाजूने रेनिंग व रस्त्याला पेव्हर ब्लॉक, अॅम्युझमेंट पार्क लगतच्या नाल्याचे बांधकाम, नाल्याचे बांधकाम, उदयानामध्ये गांडूळ खत प्रक्रिया केंद्रासाठी शेड, नर्सरीसाठी शेड, सोलर हायमास्ट आदी विकास कामे आ. केसरकर यांच्या पाठपुराव्याने मंजूर करण्यात आली आहे.