कारिवडेत विविध विकास कामांची भूमिपूजने..!

Edited by:
Published on: March 14, 2024 14:56 PM
views 237  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत कारिवडेच्यावतीने आज कारिवडे गावात रस्त्याच्या विकास कामांची भुमीपुजने सरपंच आरती अशोक माळकर यांचे हस्ते करण्पायात आली. कारिवडे ख्रिश्चनवाडीपासुन श्री.न्हानु सावंत(माजी चेअरमन) यांचे घरापर्यंत जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे, कारिवडे भैरववाडी ओटवणे इजिमा 78 मजबुतीकरण करणे,  कारिवडे चराठा पागावाडी इन्सुली  प्रजिमा  58 किमी २/०० ते ४/५०० व.६/५०० ते ८/०० मध्ये संरक्षक भिंती व संरक्षक कठडे बांधणे तसेच रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजना करणे या कामांची भुमीपुजने करण्यात आली.

यावेळी कारिवडे गावचे सरपंच मा.सौ.आरती अशोक माळकर, माजी पं.स.सदस्या सौ.प्राजक्ता केळुसकर,ग्रामपंचायत सदस्य श्री.महेश गांवकर,ग्रामपंचायत सदस्य सौ.साक्षी  परब,ग्रामपंचायत सदस्य सौ.प्रतिभा जाधव,श्री.अशोक माळकर,भाजपा आंबोली मंडळ उपाध्यक्ष,तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री.लक्ष्मण गांवकर,बुथ अध्यक्ष श्री.उमेश उर्फ बाळा गांवकर,माजी उपसरपंच श्री.आलेक्स गोम्स,श्री.सुरज ठाकुर,श्री.प्रशांत राणे तसेच ख्रिश्चनवाडीतील  महिला व ग्रामस्थ कारिवडे गावातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.