
देवगड : शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त निधी मधून महाळुंगे गावात विकास कामांचे भूमिपूजन देवगड-कणकवली-वैभववाडी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शनिवार दि.२ डिसेंम्बर २३ रोजी करणार आहोत अशी माहिती महाळुंगे सरपंच संदीप देवळेकर यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना हर घर जल या जलजीवन योजने अंतर्गत पाणी साठा टाकीचे भूमिपूजन दुपारी १२.३० वाजता स्थळ -धनगर वाडी राज्य समाज कल्याण विभाग यांच्या वतीने खुली व्यायामशाळा उदघाटन दुपारी १२.४५ स्थळ- बौद्ध वाडी डोंगरी विकास निधी गावठाण ते स्मशानभूमी रस्ता भूमिपूजन दुपारी १ वाजता ( निधी १० लाख ) जिल्हा वार्षिक जनसुविधा ग्रामपंचायत ते बौद्ध वाडी रस्ता भूमिपूजन दुपारी १.१५ वाजता ( निधी ५ लाख )स्थळ- ग्रामपंचायत जवळ आमदार यांचे आभार व सत्कार समारंभ दुपारी १.३० वाजता स्थळ- ग्रामपंचायत कार्यालय येथे होणार आहे. असे सरपंच संदीप देवळेकर यांनी कळवले आहे.