
सावंतवाडी : हिंदुत्वाचा झंझावात संभाजी भिडे गुरुजी येत्या रविवारी सावंतवाडीत येणार आहेत. शहरातील सर्व हिंदू समाजाला शिवचरित्र देव,देश व धर्म या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी ते शहरात येत आहेत.
रविवार 18 ऑगस्ट संध्याकाळी ठीक ५ वाजता रवींद्र मंगल कार्यालय येथे ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सावंतवाडी शहरातील सर्व हिंदू बांधवांनी धर्म कर्तव्य समजून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.