भावई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त युवराजांनी घेतलं दर्शन !

Edited by: विनायक गावस
Published on: December 06, 2023 19:18 PM
views 124  views

सावंतवाडी : कुणकेरी गावचे ग्रामदैवत श्री देवी भावई देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवा निमित्त सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी भेट देत देवीचे आशीर्वाद घेतले.

नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी भावई देवीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. मंदिरात सकाळपासून धार्मिक कार्यक्रम पार पडले. रात्री १० वाजता सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावपंच, स्थानिक देवस्थान कमिटी आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे.