संकटात धावून जाणारा 'भाऊ' हरपला

Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2025 11:34 AM
views 826  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील व्यवसायिक भाऊ नाटेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. सालईवाडा येथील‌ राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाऊ या नावानं ते सर्वत्र परिचित होते. गोरगरीब, संकटात असणाऱ्या जनतेसाठी धाऊन जाणारा भाऊ अशी त्यांची ओळख होती. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत असून येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.