
रत्नागिरी : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुडाळ पोलिसांनी भास्कर जाधवांना नोटीस बजावली आहे. कुडाळमधील शिवसेनेच्या मोर्चात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील निवासस्थानी जात 41(अ)अन्वये नोटीस बजावली आहे. तपासकार्यात सहकार्य करावे, नोटीस मधील नमूद अटी -शर्थीचे पालन करावे, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे