
ओरोस : भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) ओरोस मंडल कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये विविध पदांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, गाव आंबडपाल येथील माजी जिल्हा परिषद सदस्य भारती विनायक चव्हाण यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ओरोस मंडल अध्यक्ष आनंद (भाई) सावंत यांनी ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू केली आहे. भाजपमध्ये काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याला कार्यकारिणीमध्ये स्थान मिळाल्याने आंबडपाल गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
पक्षासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन ही जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या निवडीबद्दल आनंद (भाई) सावंत यांनी भारती चव्हाण यांचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या नियुक्तीमुळे आगामी काळात ओरोस मंडलातील भाजपच्या कामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारती चव्हाण यांना मिळालेल्या या नवीन जबाबदारीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.