एनएमएमएस परीक्षेत नेमळे वि‌द्यालयाची भार्गवी आळवे द्वितीय

Edited by: विनायक गांवस
Published on: April 25, 2024 11:41 AM
views 49  views

सावंतवाडी : २४ डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या एनएमएमएस परीक्षेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक वि‌द्यालयातील आठवीत शिकणारी वि‌द्यार्थीनी भार्गवी घनश्याम आळवे हिने इतर मागास प्रवर्गातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. एनएमएमएसची सारथी शिष्यवृत्तीधारक हर्ष तुकाराम वारंग, आदित्य गंगाराम परब, लावण्या दीपक गुडेकर या वि‌द्यार्थ्यांची निवड झाली आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्याथ्यर्थ्यांना इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दरवर्षी १२००० रुपये मिळणार आहेत. प्रशालेतील एकूण २१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी चार वि‌द्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ.भि. राऊळ, व प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले. यशप्राप्त वि‌द्यार्थ्यांना माजी प्राचार्य किरण वेटे, नितिन धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.