
सिंधुदुर्गनगरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह कार्यक्रम दि. ०८ एप्रिल पासून राबविला जात आहे. यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत दि. ०८ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक समता सप्ताहचे उद्घाटन करणे, या कालावधीत भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्ताविका यांचे नियमित वाचन करणे व जनजागृती करणे, दि.09 एप्रिल रोजी जिल्ह्यातील महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांबर आधारीत वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन, दि. 10 एप्रिल रोजी समतादूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे विविध योजनाबाबत जनतेचे प्रबोधन करणे, मार्जिन मनी योजनेतंर्गत कार्यशाळा राबविणे, दि.11 एप्रिल, रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे व व्याख्याने, दि.१२ एप्रिल रोजी संविधान जागर व संविधान जनजागृतीसाठी कार्यक्रम, दि. १३ एप्रिल रोजी जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व नागरीकांचा मेळावा, जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्याने सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह येथे रक्तदान शिबीर तसेच स्वाधार शिष्यवृत्ती मिनी ट्रॅक्टर लाभाथ्यांना प्रतिनिधिक वाटप दि. १४ एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गत अधिनस्त शासकीय कार्यालये, महाविद्यालय, आश्रम शाळा, येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करणे व इतर कार्यक्रम व्याख्याने, चर्चासत्रे व सामाजिक समता सप्ताहाचे समारोप करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त नागरीक, विद्यार्थी, शासकीय वसितगृहातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी उपक्रमात सहभाग घेवून लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केलेले आहे.