भरणीच्या गावपॅनल प्रमुखांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजमध्ये प्रवेश...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 04, 2024 11:17 AM
views 259  views

कणकवली : तालुक्यातील भरणी येथील गाव पॅनलचे असंख्य कार्यकर्ते प्रशांत घाडीगावकर प्रविण जगताप लक्ष्मी जगताप, वैदेही पुजारी, मनीष पाताडे, प्रकाश वागले,सुधीर वायंगणकर, अनिकेत माणे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला.आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली विभागातील मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. भरणी गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे सांगितले. उपस्थित संदेश सावंत, मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत, स्वप्निल चिंदरकर  राजू हिरलेकर, किरण मेस्त्री सरपंच आदि भाजप उपस्थित होते..