पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी भराडी देवीकडे साकडे

Edited by: भरत केसरकर
Published on: February 04, 2024 15:13 PM
views 256  views

मालवण : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विराजमान होऊ देत यासाठी आंगणेवाडी येथील भराडी देवीला गाऱ्हाणे घालण्यात आलं. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी येथील भराडी देवीचे सपत्नीक दर्शन घेतलं.

यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विनायक राऊत यांनी अशा पद्धतीची अशा पद्धतीचे सांगणे केल्यानंतर तेथील पुजाऱ्यांना देवीला गाऱ्हाणे घातलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या गाऱ्हाण्याला साथ दिली.