
वैभववाडी : तीन अपत्य असताना ग्रामसेवक म्हणुन नियुक्ती घेतलेल्या ग्रामसेविका सविता काळे-हांडे यांची चौकशी न झाल्याने तक्रारदार भानुदास तावडे हे आक्रमक झाले.संबंधित ग्रामसेविकेवर १५दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा यांनी प्रशासनाला दिला आहे.
श्री.तावडे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तालुक्यातील ग्रामसेविका श्रीमती सविता काळे हांडे-ह्या तीन अपत्ये असताना शासकीय सेवेत रुजू झाल्या.याबाबात श्री.तावडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे दोन महीन्यांपुर्वी तक्रार केली होती.याबाबबतचे सर्व कागदपत्रे व पुरावे संबंधित विभागाकडे सादर केले होते.मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.अखेर श्री.तावडे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन पुन्हा निवेदन दिले.या निवेदनात त्यांनी शासनाच्या लोकसंख्या अधिनियम २००५ नुसार सन २००५ नंतर तिसरे अपत्य असलेल्या व्यक्तीला शासकीय सेवेत भरती होता येत नाही.परंतु ग्रामसेविका सविता काळे-हांडे यांना तिसरे अपत्य सन २००७ मध्ये असताना त्या सन २०१४ मध्ये ग्रामसेवक म्हणुन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भरती झाल्या.यासंदर्भात आपण ६५ दिवसांपुर्वी जिल्हा परिषद प्रशासनाकडे या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.या प्रकरणात शासनाची फसवणुक करण्यात आली आहे.त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण केली होती.याशिवाय सन २०१४ ते सन २०२४ या कालावधीत त्यांनी शासनाकडुन घेतलेली पगारापोटी घेतलेली रक्कम व्याजांसह वसुल करावी अशी मागणी केली होती.हा प्रकार संगनमताने केलेला आहे.त्यामुळे दोघांचीही चौकशी होवुन कारवाई होणे गरजेचे आहे.मात्र ६५ दिवसानंतर देखील कोणतीही कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने केलेली नाही.त्यामुळे या प्रकाराची येत्या १५ दिवसांत चौकशी करून कारवाई न झाल्यास आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा श्री.तावडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.