
दोडामार्ग : दीपोत्सव समिती भेडशी आयोजित खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक भक्ती जामसंडेकर, द्वितीय मृणाल सावंत तर तृतीय पूजा राणे यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले.
दीपोत्सव समिती भेडशी - २०२२ आयोजित खुली रेकॉर्ड स्पर्धा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेत प्रथम क्रमांक भक्ती जामसंडेकर (सावंतवाडी), द्वितीय मृणाल सावंत (पिंगुळी कुडाळ), तृतीय पूजा राणे (रेडी) उत्तेजनार्थ नेहा जाधव, चिन्मय बोरकर, समर्थ गवंडी तर लहान गटमधून उत्तेजनार्थ सोहम जांभोरे, आरव आईर, अरुणीका सांगवेकर यांनी मिळविला.
द्वितीय क्रमांक विजेती मृणाल सावंत हिचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपसरपंच गणपत डांगी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी निलेश तळणकर, दादा मोरजकर, गोविंद शिरसाठ, रामचंद्र भणगे, सिद्धेश पांगम, जयदेव मणेरकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण संतोष भिसे व अजित कुबडे यांनी केले. या स्पर्धेमध्ये एकूण ३१ स्पर्धक सहभागी झाले होते. या विजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमांचे सूत्रसंचलन जयदेव मणेरकर, सिद्धेश पांगम यांनी केले.