पाडलोसमध्ये 10 ऑगस्टला भजन स्पर्धा !

Edited by: विनायक गांवस
Published on: August 07, 2024 08:08 AM
views 177  views

सावंतवाडी : पाडलोस गाव व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शनिवार 10 ऑगस्ट रोजी संध्या. 5 वा. श्री देव रवळनाथ मंदिरात स्पर्धा पार पडणार. भजन स्पर्धेचे तिसरे पर्व असून यावर्षी ‘करूया भजन थाटांच्या संगतीने’ संकल्पनेवर आधारीत आहे. 


स्पर्धेसाठी 8 ते 10 संघांची निवड केली जाणार आहे. प्रथम पारितोषिक रुपये 7001 व सन्मानचिन्ह, द्वितीय रुपये 5001 व सन्मानचिन्ह, तृतीय रुपये 3001 व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक रुपये 1501 व सन्मानचिन्ह, द्वितीय रुपये 1001 व सन्मानचिन्ह तसेच उत्कृष्ट गायक, हार्मोनियमवादक, पखवाजवादक, तबलावादक, झांजवादक, कोरस, गजर, राग सादरीकरण यांनाही रोख रक्कम व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी नियम व अटी असल्याचे पाडलोस गाव व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपचे अध्यक्ष राजाराम(पपी) गावडे व सचिव प्रणीत गावडे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी खजिनदार अमेय गावडे  यांच्याशी संपर्क साधावा.