
सावंतवाडी : मांतोड रामेश्वर मंदिर येथे समस्त गावकर मंडळी,देवस्थान कमिटी व श्री देवी सातेरी युवक कलाक्रिडा मंडळ,मांतोड यांच्या संयुक्त विद्यमाने हरिनाम सप्ताहानिमित्त शनिवार २ व रविवार ३ सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत निवडक दहा भजन संघांचा सहभाग आहे. शनिवार २ रोजी श्री क्षेत्रपालेश्वर भजन मंडळ,होडावडा ( बुवा - दत्तप्रसाद गुळेकर ) श्री कुलदेवता भजन मंडळ,मांतोड सावंतवाडा ( बुवा - कुर. अदिती परब ) श्री सिद्धेश्वर सातेरी भजन मंडळ,तळवडे ( बुवा- काशिनाथ परब ) गोठण भजन मंडळ,वजराट ( बुवा - सोमेश वेंगुर्लेकर ) रवळनाथ नवतरुण भजन मंडळ,ओटवणे ( बुवा - आत्माराम कवठणकर ) रविवार ३ सप्टेंबर रोजी श्री ब्राम्हणदेव भजन मंडळ,तळवडे ( बुवा - विशाल वराडकर ) जय भवानी भजन मंडळ,तळवडे ( बुवा - कु.वेदिका मोर्ये ) श्री अष्टविनायक भजन मंडळ,निरवडे ( बुवा - राज गोवेकर ) इसोटी भजन मंडळ,मातोंड भरभरवाडी ( बुवा - दादू परब ) श्री कलेश्वर पुर्वी देवी भजन मंडळ,वेत्ये ( बुवा - प्रथमेश निगुडकर ) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१ रुपये द्वितीय ३००१ तृतीय २००१ तसेच उत्तेजनार्थ १००१ वैयक्तिक पारितोषिके उकृष्ट गायक ५०१ उकृष्ट पखवाजवादक ५०१ उकृष्ट झांजवादक ५०१ उकृष्ट कोरस ५०१ व सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी विशाल घोगळे ७३५००१९००३ व सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधावा. उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळी व देवस्थान कमिटी मांतोड व श्री देवी सातेरी युवक कलाक्रिडा मंडळाने केले आहे.