कुडाळेश्वर मंदिरात भजन स्पर्धेचे आयोजन...!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 30, 2023 17:23 PM
views 132  views

कुडाळ : येथील कुडाळेश्वर मंदिरात कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने 48 वी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय अँड. अभय देसाई स्मृती भजन स्पर्धा रविवार दि. १५ ते सोमवार दी. २३ आॅक्टोबर या कालावधीत श्री देव कुडाळेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. या भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 15 हजार, द्वितीय क्रमांक 10 हजार तृतीय क्रमांक 7 हजार चतुर्थ क्रमांक 5 हजार पाचवा क्रमांक अडीच हजारअशी रोख बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत

याव्यतिरिक्त वैयक्तिक रोख बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत कायमस्वरूपी चषक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. याबाबतची नाव नोंदणी  12आँक्टोबरपर्यत किशोर काणेकर बाजारपेठ कुडाळ (9765661313) या ठिकाणी स्वीकारले जातील.

अधिक माहितीसाठी महेश कुडाळकर (9420210020) यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. वेळेचे बंधन असल्याने प्रथम येणाऱ्या 20 संघांना प्रवेश देण्यात येईल तरी सर्व भजन मंडळानी या भजन स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन श्री कुडाळेश्वर उत्सव मंडळाने केले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भजन मंडळास एक हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.