निरवडे देवी भराडी मंदिरात भजन स्पर्धेचे आयोजन

Edited by: विनायक गावस
Published on: November 19, 2023 17:45 PM
views 54  views

सावंतवाडी : श्री देवी भराडी रवळनाथ देवस्थान निरवडे कोनापाल आयोजित अंखड हरिनाम सप्ताहानिमित्त निरवडे कोनापाल येथे श्री देवी भराडी मंदिरात गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता उद्घाटन व ६ वाजल्यापासून भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

यात सायंकाळी ६ वाजता विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ,आंबेगाव ( बुवा- गोविंद मेस्री) सायंकाळी ६.४५ वाजता उमळकर प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ ( बुवा - अमित उमळकर) रात्री ७.३० वाजता महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी ( बुवा - प्रसाद आमडोसकर ) रात्री ८.१५ दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी ( बुवा - विराज तांबे) रात्री ९ वाजता लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवली ( बुवा- योगेश मेस्री ) रात्री ९.४५ मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ,नेरुर (बुवा भार्गव गावडे ) रात्री १०.३० वाजता समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ, मळगांव (बुवा - गौरांग राऊळ ) रात्री ११.१५ वाजता ईसवटी प्रासादिक भजन मंडळ, मातोंड (बुवा - सचिन सावंत ) रात्री १२ वाजता सद्गुरुनाथ प्रासादिक भजन मंडळ, तुळस (बुवा - सिद्धेश नाईक ) रात्री १२.४५ वाजता रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी ( बुवा - रुपेश यमकर) हे संघ सहभागी होणार आहे. प्रथम पारितोषिक ७००१ रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक ५००१ रुपये व सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक ३००१ रुपये व सन्मानचिन्ह,उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक १५०१ रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक १५०१ रुपये व सन्मानचिन्ह तसेच उकृष्ट गायक - १००१ व सन्मानचिन्ह,उकृष्ट हार्मोनियम - १००१ व सन्मानचिन्ह,उकृष्ट पखवाज - १००१ रुपये व सन्मानचिन्ह,उकृष्ट तबला - १००१ रुपये व सन्मानचिन्ह,उकृष्ट झांजवादक - १००१ रुपये व सन्मानचिन्ह,उकृष्ट कोरस - १००१ रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.