
सिंधुदुर्गनगरी : घावनळे खोचरेवाडी येथील रहिवासी भागीरथी न्हानु खोचरे (दुकानदार आई) हीचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.
घावनळे खोचरेवाडी येथील आध्यात्मिक आणि सामाजिक अशा पर्वाचा आज अंत झाला. माणगाव येथील प्रतिथ यश व्यावसायिक बाळा खोचरे, चौके ता. मालवण हायस्कूलचे निवृत्त शिक्षक राजन खो, तुळसुली गौतमवाडी येथील प्रसिद्ध व्यावसायिक वासू खोचरे यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या पश्चात चार मुलगे,पाच सूना ,एक मुली, जावई नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.