
दोडामार्ग : दोडामार्ग आयी राज्यमार्गाची जागोजागी खड्डे पडून अक्षरशः चाळणंच झाल्याने संतप्त नागरिकांनी त्या खड्ड्यात चक्क सुपारी रोपाची लागवड करत नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे टर बांधकाम विभागाला धडक देत येत्या दोन दिवसात रस्त्याची डागडुजी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचाहि इशारा यथील बाळा शिरोडकर, अॅड. प्रवीण नाईक, सत्यवान गवस, समीर म्हावस्कर यांनी बांधकाम विभागाला दिला आहे.
दिलेल्या निवेदना म्हटले की दोडामार्ग आयी राज्य मार्ग हा मृत्युंचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करून आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. येथील च सिएनजि पंप जवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचून राहते त्यामुळे वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज पण येत नाही. एवढे असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे गाभीर्याने लक्ष देत नाही या रस्त्यात जर कोणाचा अपघात घडला किंवा जीवित हानी घडली तर याला सर्वस्वी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
येत्या दोन दिवसात या रस्त्याची डागडुजी करून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला नाही तर येथील आंबडगाव, माटणे, आयी, वझरे या गावातील सर्व नागरिक आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे .यावेळी निवेदन देताना सत्यवान गवस, ऍड प्रवीण नाईक, समीर म्हावसकर आदी उवस्तीत होते.