सच्चा लोकसेवकावर सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

तहसीलदार अरुण खानोलकर यांसह नायब तहसीलदार देसाई यांचा सन्मान
Edited by: संदीप देसाई
Published on: August 01, 2023 11:50 AM
views 184  views

दोडामार्ग : दोडामार्गमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवा बजावणाऱ्या तहसीलदार अरुण खानोलकर यांचा आज सेवानिवृत्तीपर कार्यालयाकडून विशेष सन्मान करण्यात आला. तर याच दिवशी सेवानिवृत्त होणाऱ्या नायब तहसीलदार नाना देसाई यांनाही महसूल प्रशासनाकडून शुभेच्छा देण्यात आला.


तब्बल 39 वर्षांची प्रदीर्घ महसूल मधील सेवा बजावणारे दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर हे गेली पावणेतीन वर्ष  दोडामार्ग तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वसामान्य जनतेसाठी आणि दोडामार्ग वासियांच्या हितासाठी लोकाभिमुख कारभार हाकला. कोरोना सारख्या कठीण काळात आणि तिलारी पूरस्थिती हाताळण्यात तसेच कळणे येथील खाण्याचा बाण फुटल्यानंतर उद्भवलेल्या कठीण काळात त्यांनी येथील जनतेसाठी ग्राउंड वर उतरून विशेष कर्तव्य बजावले. दोडामार्गमध्ये गेली पावणेतीन वर्षे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले अरुण खानोलकर 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने सोमवारी सायंकाळी तहसीलदार कार्यालयात त्यांना नवनिर्वाचित तहसीलदार संकेत यमगर व सहकाऱ्यांनी सदिच्छा दिल्या या सदिच्छा कार्यक्रमात 16 मार्च पोलीस निरीक्षक अरुण पवार, गटविकास अधिकारी सावंत, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जाधव, विस्तार अधिकारी सुजित गायकवाड, मंडळ अधिकारी राजन गवस, एस. के. शिरसाट सौ. नाईक, सौ. गवस यांनी कार्यालयाच्यावतीनं तहसीलदार अरुण खानोलकर व नायब तहसीलदार नाना देसाई यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा दिल्या. 

  पत्रकार समितीने दिल्या सदिच्छा

तत्पूर्वी सकाळी पत्रकार समितीनेही तहसीलदार अरुण खानोलकर व नायब तहसीलदार नाना देसाई यांना अध्यक्ष संदीप देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा दिल्या. यावेळी त्यांचे समवेत पत्रकार रत्नदीप गवस, संदेश देसाई, ओम देसाई, समीर ठाकूर उपस्थित होते.



उबाठा सेनेकडूनही झाला सन्मान

  तर सर्वसामान्यासाठी कर्तव्या पलिकडे जाऊन सहकार्य करणाऱ्या खानोलकर व देसाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, युवा सेना तालुका संघटक संदेश राणे, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, उपतालुका संघटक संदेश वरक, शाम खडपकर, शिवराम मोर्लेकर, दशरथ मोरजकर, विजय जाधव, शंकर देसाई आदी उपस्थित होते.