
दोडामार्ग : उत्कृष्ट गायक, विनोदी कलाकार, हास्यसम्राट आणि गजालीकर अशी बहुआयामी ओळख असलेले युवा भजनी कलाकार राजेश नाईक यांनी तुळस येथे झालेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादकाचा मान पटकावला. त्याचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
त्यांच्या सुरेल आणि दर्जेदार हार्मोनियम वादनाने परीक्षकांसह भजनी कलाकारांची मने जिंकली. यापूर्वीही गोवा फोंडा येथेही त्यांचा उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून सन्मान झाला होता.
झरेबांबर गावासाठी ही मोठी अभिमानाची बाब ठरली असून सर्व स्तरातून राजेश यांच्या यशाचे कौतुक होत आहे. तो अनेक भजनी कलाकार व युवा हार्मोनियम वादक तसेचं संगीत कलेतील विद्यार्थ्यांनाही हार्मोनियम वादनाचे धडे देत आहे.










