
सावंतवाडी : गतवर्षी 18 जुलै रोजी बस स्थानक दुरावस्था प्रश्नावरती महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल होत. वर्षभर पाठ पुरवठा करूनही इथे सरकारने दुर्लक्ष केला. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी अक्षरश दुर्गंध युक्त पाण्यातून वाट काढत आहे.
ही स्थिती गेले सहा वर्ष अशीच आहे. सावंतवाडी बस स्थानक हे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आहे. या प्रश्नावर त्यांच लक्ष वेधण्यासाठी तसेच त्यांनी पाऊस पडत असताना बस स्थानकाला भेट देण्यासाठी 18 जुलै रोजी घंटानात करण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे