
वैभववाडी : कोकीसरे बेळेकरवाडी येथे जाणारी सद्यस्थितीत बंद असलेली पायवाट खुली करून मिळावी या मागणीसाठी येथील ग्रामस्थ सोमवार १४एप्रिलला तहसीलदार कार्यालयास उपोषण छेडणार आहेत. याबाबतच निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिले.
येथील बेळेकरवाडीत जाण्यासाठी जुनी पायवाट होती. मात्र ही पायवाट गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली. यामुळे या वाडीतील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय होत आहे. तसेच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.ही पायवाट खुली करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.