'त्या' चिमुकल्यासाठी संकटमोचक बनून 'ते' धावले..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 02, 2023 15:57 PM
views 387  views

सावंतवाडी : शहरातील भटवाडी येथील एका फ्लॅटच्या बेडरूममध्ये अडकलेल्या दोन वर्षाच्या मुलाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले.  काल भटवाडी येथील एका बिल्डिंगमधील फ्लॅटच्या बेडरूमला दोन वर्षाच्या चिमुकल्याने आतून कडी घातली. हा मुलगा जोरजोराने रडायला लागल्यान हा प्रकार मुलाच्या आईच्या लक्षात आला. आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली.  सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते माजी नगरसेवक संजय पेडणेकर व शामराव हळदणकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तिसऱ्या मजल्याच्या बाहेरून बिल्डिंगवर चढून मोठ्या कसरतीने बेडरूमच्या खिडकीचे ग्रील कापून खिडकीतून त्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला व त्या मुलाला सुखरूप बाहेर काढत पालकांच्या स्वादीन केले. सामाजिक बांधिलकीच्या कार्याच सर्वत्र कौतुक होत आहे.