
देवगड : ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये हस्ताक्षर तज्ञ डाॅ. भाई बांदकर यांची कार्यशाळा झाली. डाॅ. भाई बांदकर यांचा हा ६७९४ वा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ओरोस सरकारी हाॅस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुशीलकुमार परब हे होते. डाॅ. सुशीलकुमार परब यांनी संपुर्ण कार्यक्रम अनुभवल्यानंतर आपले मत व्यक्त केले की अशा कार्यशाळा फक्त पालकांसाठी व इतर नागरिकांसाठीही ठिकठिकाणी व्हावेत.
सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना आहे असे पूर्वापार ऐकत आलो आहोत पण मी म्हणेन सुंदर हस्ताक्षर हा लेखनाचा अविभाज्य घटक आहे.भले आपणांस सर्व तोंडपाठ असेल पण मग कोणत्याही लेखी परीक्षेत तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जेवढे पाठ आहे. तेवढे तरी पैकीच्या पैकी मार्क्स का मिळत नाहीत? त्याचे उत्तर आहे तुमचे अवाचनीय हस्ताक्षर..या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अशोक रायबान, शालेय समिती सदस्य .संजय लाड, डॉ. परब, शिक्षक अशोक गीते, संजीव राणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अतिथी भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनीही या कार्यशाळेचे कौतुक केले.या कार्यक्रमाच्या आयोजिका प्रीती देवधर यांनी आयोजनाबरोबरच आर्थिक साक्षरतेविषयी थोडक्यात माहिती सांगितली.