मारहाण, धमकी - विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

Edited by:
Published on: January 23, 2024 14:13 PM
views 88  views

सिंधुदुर्ग : ०५ मे २०१८ ला मारहाण, धमकी आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात काही आरोपींविरुद्ध भां.द.वी कलम ३५४ (१) (४), ३५४ (ब), १०९, ५०६, ३३६ सह ३४ प्रमाणे वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

फिर्यादी पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या म्हणण्यानुसार सदर घटनेच्या वेळी फिर्यादिने आरोपी नं. १ हिस मारहाण केल्याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली होती. त्यामुळे केवळ सदर केसला शह देण्यासाठी फिर्यादी हिने हि खोटी केस दाखल केलेली होती. न्यायालयासमोर आलेला पुरावा याचा विचार करता वेंगुर्ले येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. पाटील यांनी सबळ पुराव्यांअभावी आरोपींची निर्दोश मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. मिहीर श्रीकृष्ण उर्फ अजित भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनील मालवणकर, अॅड. तेजाली भणगे व अॅड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पहिले.