
वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरात काल ८ एप्रिल रोजी रात्री मेडिकल कॉलेजच्या ३ विद्यार्थ्यांना सोलापूर येथून आलेल्या तरुणांनी जबर मारहाण केली. यात एकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला अधिक उपचारासाठी पडवे मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले आहे. तर दरम्यान या तिघांना सकाळी मारहाण करून संपूर्ण दिवस नजर कैदेत ठेवल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे शांत वेंगुर्ल्यात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत वेंगुर्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.