तुका जमीन व्हयी काय..? | जमिनीच्या वादातून मारहाण

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 28, 2023 12:18 PM
views 370  views

सिंधुदुर्ग : सामायिक जमिनीच्या वादातून एकमेकांना मारहाण करीत जखमी करून जीव मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोन गटातील एकूण पाच जणांविरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. फिर्यादी मदन नामदेव परब वय-47 वर्षे  रा. ओरोस बुद्रुक, मधली परबवाडी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार संशयित आरोपी महेश नामदेव परब व मैथिली महेश परब दोन्ही रा. जिजामाता चौक, ख्रिश्चनवाडी, ता. कुडाळ यांनी 23 नोव्हेंबर 2023 रोजी  10.30 वा. ओरोस बुद्रुक, मधली परबवाडी येथे सामायिक वडिलोपार्जित जागेच्या जमिनीच्या कारणावरून सचिन सिताराम पालकर व सत्यवान नामदेव परब हे फिर्यादी यांचे घराचे अंगणात जमिनी संदर्भात बोलत उभे असताना महेश नामदेव परब आपल्या पत्नी समवेत मोटार सायकलने आमच्या घराजवळ आला व तुका जमीन व्हयी काय तुका मी ठारच मारून टाकतलय असे म्हणून सत्यवान परब यास ठार मारण्याचे उद्देशाने अंगणात पडलेला अर्धवट चिऱ्याचा मोठा तुकडा दोन्ही हाताने उचलून सत्यवान परब यांच्यावर मारत असताना त्याला सोडवण्यासाठी तक्रारदार गेले असताना सत्यवान परब यांनी तोच दगड तक्रारदार यास ठार मारण्याच्या उद्देशाने दोन्ही हाताने डोक्यावर घातला.

त्यामुळे तक्रारदार मदन परब यांच्या डोकीला गंभीर दुखापत झालेली आहे. तसेच  मैथिली महेश परब हिने फिर्यादी यांना शिवीगाळ करत बाजूस पडलेल्या लोखंडी पोकळ चौकोनी पाईप ने फिर्यादी यांच्या उजव्या हातावर मारून दुखापत केली व शिवीगाळ करत मोटरसायकलने निघून गेली.

फिर्यादी महेश नामदेव परब वय-46 वर्षे  रा. ओरोस जिजामाता नगर, महापुरुष कॉलनी, मुंबई गोवा हायवे नजीक  यांनी दिलेल्या तक्रारी नुसार संशयित आरोपी मदन नामदेव परब, सत्यवान नामदेव परब, गणेश नामदेव परब सर्व रा. ओरोस,मधलीवाडी, ता. कुडाळ, व सचिन सिताराम पालकर रा.ओरोस, ता. कुडाळ यांनी 23 नोव्हेंबर 2023 रोजी  10.30 वा. ओरोस बुद्रुक, मधली परबवाडी येथे  फिर्यादी रेशन दुकानात वरची परबवाडी येथे जात असताना मधली परबवाडी येथे त्यांच्या जुन्या घराकडे मदन नामदेव परब, सत्यवान नामदेव परब, गणेश नामदेव परब  व सचिन सिताराम पालकर रा. ओरोस यांनी मिळून फिर्यादी यांना चौकोनी पाईपने मारहाण करून दुखापत केली तसेच फिर्यादी यांच्या पत्नीला ढकलाबुकल करून अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. यात महेश  नामदेव परब व मैथिली महेश परब या जखमी झाल्या आहेत. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी हे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.