प्राथमिक मध्ये बाव, माध्यमिक मध्ये कुडाळ हायस्कूल प्रथम

कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा माणगाव हायस्कूलमध्ये शानदार समारोप
Edited by: भरत केसरकर
Published on: December 10, 2023 19:30 PM
views 117  views

कुडाळ : श्री वा.स. विद्यालय माणगाव येथे संपन्न झालेल्या कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात रामेश्वर विद्यालय बावच्या अनन्या अनिकेत वेतुरेकर (IAD सिस्टीम) तर माध्यमिक गटात कुडाळ हायस्कूलच्या हर्ष दत्ताराम चिरेकर( टेलिस्कोप) यांनी विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. समारोप कार्यक्रम कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सगुण धुरी होते.तर प्रमुख पाहुणे कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक उपस्थित होते.

या बक्षिस वितरण मध्ये प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक चिन्मय नंदकुमार म्हाडेश्वर, लिंगेश्र्वर विद्यालय तुळसुली, तृतीय- दर्शित प्रवीण खरात (स्मार्ट होम) शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर यांनी मिळवला. उत्तेजनार्थ संचित मनीष तांबे (रोड सेफ्टी) हिर्लोक हायस्कूल ,महेश भास्कर पारधी (ई- हायवे) बिबवणे हायस्कूल यांना मिळाला.

प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साधन निर्मितीमध्ये प्रथम- भालचंद्र सुहास आजगावकर (विचार करू संबोध) चेंदवण पडोशी, द्वितीय -सागर सत्यप्रकाश सावंत( खेळ अंकगणिताचा) माणगाव हायस्कूल, तृतीय- नवनाथ राजाभाऊ जाधव (मापन झाले सोपे) प्राथमिक शाळा माणगाव यांना मिळाला.

प्राथमिक गटातील निबंध स्पर्धेमध्ये प्रथम- यशस्वी रामचंद्र सुतार (रामेश्वर विद्यालय बाव) द्वितीय- मयुरेश कृष्णा भोई (केरवडे तर्फ माणगाव) तृतीय- श्रेया हनुमंत साळुंखे (बिबवणे हायस्कूल) यांनी नंबर मिळविले.

वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम- सायली संदीप आळवे (झाराप कामळेवीर) द्वितीय- श्रावणी संगमेश्वर ज्योती( पणदूर हायस्कूल) तृतीय- सुखद सचिन फडके (वालावल हायस्कूल) तर प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम- श्रावणी सचिन दळवी व नेहा सचिन सावंत (माणगाव हायस्कूल) द्वितीय- भाविका महादेव सावंत व अनुश्री गणपत कविटकर (हळदीचे नेरूर हाय.) यांनी नंबर मिळविले.

इयत्ता नववी ते दहावी या माध्य. व उ. माध्य. गटात विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये द्वितीय क्रमांक रमेश राजाराम गोडे (अॅडव्हान्स ट्रक) साळगाव हायस्कूल, तृतीय- शुभम विश्राम वराडकर (ऑप्टिकल फायबरचा खाणीत उपयोग) सरंबळ हायस्कूल, उत्तेजनार्थ म्हणून विनय शिवराम सावंत (एकात्मिक शेती) कसाल हायस्कूल व शुभम सुभाष राऊळ (सौरचूल) आंब्रड हायस्कूल यांनी क्रमांक मिळवले.

शिक्षक प्रतिकृतीमध्ये प्रथम- सौ कनक कौशल कुडतरकर (ऊर्जा अक्षय्यता) बिबवणे हायस्कूल, द्वितीय- विद्यानंद अच्युत पिळणकर (अणू प्रतिकृती) साळगाव हायस्कूल तृतीय- पुंडलिक विठोबा ढेरे (प्रकाशाचे आंतरिक परावर्तन) न्यू इंग्लिश स्कूल कुडाळ यांनी क्रमांक मिळवले.

प्रयोगशाळा परिचर गटामधून प्रथम- संदीप केशव गवाणकर (मानवी रक्ताभिसरण) पणदूर हायस्कूल, द्वितीय- महादेव आप्पा न्हावेलकर (धूर शोषक) माणगाव हायस्कूल, तृतीय- अशोक इब्रामपूरकर (गॅस मुव्हर) हळदीचे नेहरू हायस्कूल यांनी क्रमांक मिळविले.

निबंध स्पर्धेमध्ये प्रथम- सुहानी सुगंध मोंडकर (कुडाळ हायस्कूल) द्वितीय- पूर्वा आत्माराम तळेकर (सरंबळ हायस्कूल) तृतीय- विद्या परशुराम बांदेकर (माणगाव हायस्कूल) तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम- समिक्षा सचिन फडके (वालावल हायस्कूल) द्वितीय- सुपर्ण श्रीकृष्ण पोखरणकर (पोखरण हायस्कूल) तृतीय- चंदना महादेव पावस्कर (कुडाळ हायस्कूल) यांनी बक्षीसे पटकावली.

माध्यमिक गटात प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम- सिमरन गोविंद कोरगावकर व तन्वी वामन काणेकर (माणगाव हायस्कूल) द्वितीय- सौजन्या संजय घाटकर व फाल्गुनी सतीश गोवेकर (बॅरिस्टर नाथ पै.) यांनी क्रमांक मिळविले.

पारितोषिक वितरणाची सुरुवात माणगाव हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी सुरेख ईशस्तवन व विज्ञान गीताने केली. प्रमुख अतिथी मनोगतामध्ये अमोल पाठक यांनी विद्यार्थ्यांना छोटे छोटे प्रयोग करण्याचे आवाहन करत कौशल्य, जिज्ञासा विकसित करा व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये सगुण धुरी यांनी एकूणच बदलांचा आढावा घेत जिद्द चिकाटीने अभ्यास करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

उपस्थितांचे स्वागत गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर व मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव एकनाथ केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वि.न. आकेरकर, संस्था विश्वस्त चंद्रशेखर जोशी, केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण, तलाठी श्री.शेणवी, साईनाथ नार्वेकर, दत्तदिगंबर धुरी, मुख्याध्यापक श्री. रावण, अजित परब, विषय तज्ज्ञ हेमांगी जोशी, केंद्रप्रमुख दिनकर तळवणेकर, माणगाव सरपंच मनिषा भोसले, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पास्ते व गीतांजली टेमकर यांनी केले. यशस्वी आयोजनाबद्दल माणगाव शिक्षण प्रसारक संस्था व हायस्कूल यांचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण १५ दालने तयार करण्यात आली होती. उच्च प्राथमिक गटात विद्यार्थी प्रतिकृती-४८, निबंध-५६, वक्तृत्व-४६ तसेच माध्यमिक गटात विद्यार्थी प्रतिकृती-२५, निबंध-३०, वक्तृत्व-२९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माध्यमिक शिक्षक प्रतिकृती- ४, प्राथमिक शिक्षक प्रतिकृती- ८, प्रयोगशाळा परिचर-४ असा सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये २६ माध्यमिक शाळा व ३० प्राथमिक शाळा सहभागी झाल्या. यावेळी विज्ञान ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने संस्था विश्वस्त चंद्रशेखर जोशी यांच्या संकल्पनेतून अभ्यागत प्रतीक्षा कक्षाची निर्मिती करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सगुण धुरी,तहसिलदार अमोल पाठक,सचिव एकनाथ केसरकर,सीईओ वि.न आकेरकर,संचालक चंद्रशेखर जोशी,साईनाथ नार्वेकर,गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर,मुख्याध्यापक प्रशांत धोंड,उपमुख्याध्यापक संजय पिळणकर,पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण,सरपंच सौ.मनीषा भोसले,तलाठी विश्वास शेणवी,सौ.हेमांगी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांच्या नेतृत्वाखाली आणी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली आणी तीन दिवसांचा कार्यक्रम यशस्वी केला.