घावनाळेतील निराधार वृद्धाला सामाजिक बांधिलकीचा आधार

Edited by:
Published on: December 09, 2024 16:15 PM
views 278  views

सावंतवाडी : कुडाळ घावनाळे येथील तुकाराम म्हापणकर (वय वर्ष 72) हा निराधार वृद्ध काल रात्री नऊच्या दरम्याने जिमखाना परिसरामध्ये आजारी अवस्थेत तळमळत असताना पाहून सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व सुजय सावंत यांनी त्या निराधार वृद्धाकडे धाव घेतली. सर्वप्रथम या घटनेची कल्पना सावंतवाडी पोलीस स्टेशनचे बीट हवालदार पी.के कदम यांना देऊन निराधार रुग्णाला ॲम्बुलन्सद्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट केले. त्या निराधार रुग्णावर उपचार सुरू आहेत.

निराधार वृद्ध हा घावनळे येथील रहिवाशी असून गेल्या दोन दिवसाच्या पावसामध्ये भिजला होता. पोटातही अन्नाचा कण नव्हता. काल सकाळी ताप येऊन त्याला ओमीटिंग होत होतं. त्यामुळे तो रस्त्यावर तळमळत होता. हे पाहून सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. वृद्धाच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही.‌या वृद्ध व्यक्तीची ओळख पटल्यास सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांच्याशी संपर्क साधावा 9405264027 असं आवाहन केलं आहे.