जावेद खतीब यांनी वेधलं नितेश राणेंचं लक्ष ; बांद्याला तात्काळ मिळाले वैद्यकीय अधिकारी

Edited by: विनायक गावस
Published on: August 23, 2023 15:29 PM
views 44  views

बांदा : बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.जगदीश पाटील यांच्या बदलीनंतर रिक्त असलेल्या पदावर तात्काळ वैद्यकीय अधिकारी मिळावा यासाठी बांदा उपसरपंच जावेद खतीब व शिष्टमंडळाने आ. नितेश राणे यांची भेट घेतली होती. याची तात्काळ दखल घेत आ. नितेश राणे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले होते.

आ. नितेश राणे यांच्या पाठ पुराव्यामुळे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला मोरगाव येथील डॉ. गजानन सारंग यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिले आहे. त्यामुळे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त जागी वैद्यकीय अधिकारी मिळाला आहे. आ. नितेश राणे यांच्या पाठ पुराव्यामुळे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक झाल्याने उपसरपंच जावेद खतीब यांचे आभार मानले असून स्थानिकातून समाधान व्यक्त होत आहे.