कलेची आवड असणाऱ्यांसाठी बांदेकर आर्टमध्ये 'फाउंडेशन कोर्स'

डी. जी. बांदेकर ट्रस्टची स्थापना
Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2023 18:55 PM
views 197  views

सावंतवाडी : डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी आणि बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी या महाविद्यालयातर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअरसाठी उपयुक्त असा 'फाऊंडेशन कोर्स' यावर्षी प्रथमच सावंतवाडीत सुरू करण्यात आला आहे. या कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ आज आर्ट टिचर युनियन महाराष्ट्र व्हा. प्रेसिडेंट बाळाराम सामंत, आर्ट टिचर युनियन सिंधुदुर्ग प्रेसिडेंट रूपेश नेवगी, डी.जी. बांदेकर ट्रस्टचे चेअरमन गोविंद बांदेकर, सचिव अनुराधा बांदेकर-परब यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 


 सिंधुदुर्गातील एकमेव कलेची पदवी देणारे महाविद्यालय म्हणून गेली २५ वर्ष या क्षेत्रात हे महाविद्यालय आपला ठसा उमटवून आहे. आजपर्यंत ६५० विद्यार्थी या महाविद्यालयातून उपयोजित कलेची पदवी घेऊन मोठ्या शहरात तसेच विदेशात आपले व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव मानाने मिरवत आहेत.


या क्षेत्राकडे वळताना सीईटी परीक्षेविषयी पूर्व कल्पना व तयारी होण्याच्या दृष्टीने हा एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स खूप उपयुक्त ठरणार आहे. बदलत्या शिक्षण प्रकाराबरोबर नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना या गोष्टींकडे पाहता सॉफ्टवेअर, आर्ट, क्राफ्ट, मॉडेलिंग, अॅनिमेशन अशा गोष्टी या कोर्समध्ये विद्यार्थ्याना शिकता येणार आहेत. तर मुख्यत्वे करून या कोर्स करिता कोणत्याही सीईटी परीक्षेची अट नसल्याने केवळ १० वी व १२ वी इयता पूर्ण केलेला विद्यार्थी सहजपणे या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो.येत्या जून महिन्यापासून या फाऊंडेशन कोर्स ची सुरुवात होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कला क्षेत्राकडे वळून आपले योग्य करिअर निवडावे असे आवाहन डी.जी. बांदेकर ट्रस्टच्या सचिव अनुराधा परब-बांदेकर यांनी केले आहे. तर डी. जी. बांदेकर या कौटुंबिक ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून फाउंडेशन कोर्स हा पहिला उपक्रम संस्थेचा आहे. भविष्यात विविध क्षेत्रातील उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.

 

दरम्यान, कलेला पूरक असे वातावरण असणाऱ्या सावंतवाडीत बरेच मोठमोठे कलाकार होऊन गेले आणि

आजही नवनवीन कलाकार घडत आहेत. कलेची आवड असणाऱ्या पाल्याच्या १० वी नंतर किंवा १२ वी नंतर या कोर्स साठी प्रवेश घेता येणार आहे. या कोर्सच्या अधिक माहितीसाठी तुकाराम मोरजकर ९४०५८३०२८८ व सिद्धेश नेरुरकर ९४२०२६०९०३ यांना संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याप्रसंगी यावेळी आर्ट टिचर युनियन महाराष्ट्र व्हा. प्रेसिडेंट बाळाराम सामंत, आर्ट टिचर युनियन सिंधुदुर्ग प्रेसिडेंट रूपेश नेवगी, डी.जी. बांदेकर ट्रस्टचे चेअरमन गोविंद बांदेकर, सचिव अनुराधा बांदेकर-परब, प्र.प्राचार्य तुकाराम मोरजकर, अँड. क्षितीज परब आदी उपस्थित होते