
बांदा : मुंबई येथील नोंदणीकृत शिवाजी खैरे प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सांगेली नवोदय विद्यालयाचा सातवीचा विद्यार्थी कु. नील बांदेकर याने राज्यात तिसरा क्रमांक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून मोठे यश संपादन केले आहे. या स्पर्धेत नीलच्या गटातून राज्यभरातील ६०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. नीलला या स्पर्धेच्या तयारीसाठी त्याचे मामा डॉ. उमेश सावंत यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले.
नीलने यापूर्वी विविध स्तरांवरील ५०० हून अधिक स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली असून तो लहान वयातच कलाक्षेत्रात प्रविण्य दाखवत आहे. त्याच्या यशात आई - वडील गौरी बांदेकर आणि नितीन बांदेकर यांचीही मेहनत असून या यशा बद्दल सर्व स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.










