
सावंतवाडी: आरोस कळगुंटकरवाडी या रस्त्याचं उद्घाटन करून एक वर्ष झालं, परंतु या रस्त्याचे काम अजून पर्यंत सुरू झाले नाही. हा रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे आणि या रस्त्यासाठी दोन कोटी एकत्तीस लाख एवढं निधी मंजूर असताना सदर रस्त्याचे काम अजून पर्यंत का थांबले या संदर्भात सरपंच सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा निगुडे गावचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना उपअभियंता जी. एस. चव्हाण यांची भेट घेत निवेदन दिले.
हा रस्ता काम लवकरात लवकर सुरू करा व रस्त्याची पाहणी करा पावसामध्ये मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत त्याची पाहणी करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे निगुडे- रोणापाल रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे व रोणापाल माऊली मंदिर येथील जे पूल आहे ते खूप जुनं असल्यामुळे व वाहतुकीस अरुंद असल्यामुळे वारंवार अपघात होतात, संदर्भात प्रस्ताव सादर व पाठपुरावा करा त्याचप्रमाणे निगुडे पाटीलवाडी येथील रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे तेही मार्गी लावा अशी मागणी त्यांनी केली.